पक्षी उडतो मन मोकळे
-----------------------------
सुर्या नभात मवालताना,
काळोक मनात साचताना,
हळूच डुलकी घेती डोळे,
पक्षी उडतो मन मोकळे...
स्वर्ग की नर्क, विचार येतो
पुण्य पाप दोन्ही आठवतो,
अश्यावेळी स्वर्गहि नको,
जीवन थोडे अजुन जगतो....
पैसा गर्व आयुष्यभर जपला,
बाहेर सुद्रुढ आतुन पोकला,
आता पैसा कुठे तो नेऊ,
सांगा आयुष्य विकत कसे गेऊ...
कै. लागल्यावर सगळेच रडतील,
चांगला माणूस, खोटेही म्हणतील.
सारे संपले कधी, ते न कळे,
पक्षी उडतो मन मोकळे...
------ स्वप्निल शिंदे